top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 3
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर उतरून गुंडगिरी सुरू केली असून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी याची गांभीर्याने दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. काल ठाण्यात एका गुजराती व्यापार्‍याच्या दुकानात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी त्याला दमदाटी केली त्याने मराठीत संवाद साधणे आवश्यक आहे का ? असे विचारल्यावर त्याला झापडा मारल्या गेल्या. त्याने मराठी शिकावे लागेल असे सांगितल्यावर त्याला अजून मारहाण केली गेली. या मारहाणीचे व्हीडियो सोशल साईटवर व्हायरल झाले असून त्यात मारहाण करणार्‍या कार्यकर्त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात स्वतः दखल घेऊन कारवाई करून या गुंडांना अटक करणे आवश्यक आहे. भाषिक अस्मितेच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. महाराष्ट्र शासनाने या गुंडांना जन्माची अद्दल घडवणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ख्रिस्ती मिशनरी आणि त्यांचा धर्मप्रचार याबद्दल खूप काही बोलले जाते. आदिवासी पाडे, गरिबांच्या वस्त्या इथे जाऊन तांदूळाच्या गोण्यांचे वाटप करून सुरू असलेल्या धर्मांतर मोहिमांवर सातत्याने टीका सुद्धा होते परंतु संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत हे धर्मांतर मिशन सातत्याने रेटले जाते. ही मंडळी येशूचे चमत्कार सातत्याने सांगत असतात आणि हे सगळे चमत्कार अवैज्ञानिक , अंधश्रद्धा निर्माण करणारेच असतात. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते आश्रयदाते असल्याने अनिस वाल्यांना हे कधी दिसतच नाही. या सगळ्या पाखंडी मंडळींची वस्त्रे फेडण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याने संतप्त ख्रिस्ती नागरिकांनी त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला आणि त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना केली. पडळकर एक नंबरचे वस्ताद. त्यांनी मीडियासमोर सांगितले,” ख्रिस्ती लोक कायम म्हणतात ना किडनी नसलेल्या माणसाला येशू किडनी देतो , पैसे नसलेल्या माणसाला येशू पैसे देतो मग त्यांनी माझी आमदारकी रद्द करण्याची मागणी सुद्धा येशू कडेच करावी आणि येशूनेच चमत्कार दाखवून माझी आमदारकी रद्द करून दाखवावी.” बिचारे ख्रिस्ती नागरिक ! त्यांना हे आव्हान स्वीकारणेच शक्य नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्रात कोंग्रेसपक्ष केवळ सत्ताभ्रष्ट झाला नसून तो गलीतगात्र, संदर्भहीन , कालबाह्य होऊन आता मरणपंथाला लागला आहे. जुन्या पिढीतील मंडळींनी सत्ता भोगली. पैसे जमा केले आता ते गप्प बसले आहेत कारण न जाणो आपण तोंड उघडायचे आणि आपल्यामागे ईडी लागायची. त्यापेक्षा मौनम सर्वार्थ साधनं हीच त्यांची भूमिका आहे. नवनिर्वाचित सपकाळ यांनी हातपाय मारून पाहिले पण प्रसिद्धीचा झोत ओढून घेण्यात त्यांना अपयशच आले. त्यामुळे नाना पटोले यांनी भाजपाचे बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडून शेतकऱ्यांचा सततचा होणारा अपमान आता सहन करणार नाही, असं म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अंगावर धावून जाण्याचा पराक्रम केला. त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. दोन भावांच्या संभाव्य मनोमिलनाच्या बातमीने सगळा प्रसिद्धीचा झोत ओढून घेतल्याने नानांना सुद्धा असंसदीय वर्तन करण्याची वेळ आली. परंतु एकेकाळी जी व्यक्ती स्वतः विधानसभेची अध्यक्ष राहिली आहे त्याच व्यक्तीने असे असंसदीय वर्तन करणे हे खूप लज्जास्पद आहे. मीडियाला विनंती आहे जितकी प्रसिद्धी ठाकरेंना आणि पवारांच्या कन्येला देता त्याच्या 5-10 % प्रसिद्धी तरी कोंग्रेसवाल्यांना पण द्या रे. ते सुद्धा विरोधी पक्षात आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ओरिसा न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाने सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे. आसिफ अली नावाच्या एका नराधमाने सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. त्याचा गुन्हा ओरिसामधील उच्च न्यायालयात सिद्ध झाला. पॉस्को कायद्यानुसार या गुन्हेगाराला फाशीचीच शिक्षा दिली जाणार होती आणि ती योग्यच होती. परंतु गुन्हेगाराच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की आसिफ अली याने स्वतःला आता संपूर्णपणे अल्लाच्या चरणी समर्पित केले असून तो आता दिवसातून पाच वेळा नमाज पढतो आहे म्हणून त्याची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप दिली जावी. दुर्दैवाने दोन्ही न्यायमूरतींनी त्याचा हा युक्तिवाद मान्य करून त्याची फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. गेले काही दिवस सातत्याने न्यायमूर्तींनी धक्कादायक निर्णय दिल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे न्यायमूर्तींना नेमणारी कोलेजियम रद्द केली जाऊन तिथे सुद्धा केंद्रीय सेवा आयोगाकडून परीक्षा घेऊनच न्यायमूर्तींची नेमणूक करणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“अर्धसत्य सांगतांना ते अश्या पद्धतीने सांगावे की लोक संभ्रमित होतील.” हा साम्यवादी मंडळींचा फोर्म्युला आपल्या देशातील पत्रकारितेने उचलला आहे. गेले काही दिवस एक बातमी फिरते आहे,”संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे अध्यक्ष पद पाकिस्तानला मिळालं, 192 पैकी 182 देशाचा पाठिंबा. भारताची डोकेदुखी वाढली" सत्य काय आहे ? जगभरातील जितके देश आहेत त्या प्रत्येक देशाला अल्फाबेटिकल ऑर्डरने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे एक एक महिना अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळतो. या एक महिन्याच्या कलावधीत अध्यक्ष काय काम करतो ? सुरक्षा परिषदेच्या बैठका बोलवणे , मिटिंगचा अजेंडा ठरवणे, चर्चेला दिशा देणे, पत्रकार परिषद घेणे, ठरावांचा मजकूर तयार करणे आणि तो अधिकृत करणे. थोडक्यात या अध्यक्षाला व्यक्तिशः कोणताही वेगळा सत्ता विकेंद्रित अधिकार नसतो. हे फक्त 1 महिन्याच्या ऑफिसचा देखरेख करण्यासाठी बनवलेला अध्यक्ष असतो. हे एक मानद पद आहे. आणि दर 192 महिन्यांनी अर्थात 16 वर्षांनी एकदा पाकिस्तान हे पद भूषवणार आहे. याचा वापर करून संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे.

🔽






 
 
 

Commentaires


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page