top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

dhadakkamgarunion0

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सामान्य नागरिकांनी आम आदमी पार्टीला अक्षरशः लाथाडले इतकेच नाही तर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सुद्धा या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता या कट्टर कार्यकर्त्या आहेत आणि गेली दहा वर्षे त्या केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराशी लढत आहेत. त्यामुळे सत्तेवर येताक्षणी त्यांनी दारू घोटाळ्याची चौकशी वेगाने करण्याचा निर्णय घेतला असून केंद्र सरकारचे महालेखापाल सुद्धा या प्रकरणातील गुन्ह्यांवर कारवाई करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या डोक्यावर पुन्हा तुरुंगात जाण्याची आणि शिक्षा होण्याची टांगती तलवार आहे. संजीव अरोडा हे पंजाब मधील राज्यसभा खासदार केजरीवाल यांच्यासाठी त्याग करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना लुधियाना पश्चिम मधून उमेदवारी दिली जाणार आहे. केजरीवाल राज्यसभा खासदार जरी होऊ शकले तरी त्यांच्यावर कारवाई करताना न्यायिक प्रक्रिया अधिक वेळखाऊ होईल आणि त्यांना तितकाच दिलासा मिळू शकेल असा विचार यामागे आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देतो म्हणून आंदोलन करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी करावी लागणारी धावाधाव हा नियतीने उगवलेला सूड आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जगातील एकमेव हिंदूराष्ट्र अशी ज्याची ओळख होती त्या नेपाळला गेले दोन ते तीन दशक अशांत करण्यात चीनला यश आले. चीनने आपले प्यादे नेमून नेपाळ मधील राजेशाही संपवली. चीनच्याच प्याद्यांनी नेपाळचा हिंदूराष्ट्र हा दर्जा काढून घेतला आणि चीनच्याच कृपेने नेपाळ भारतात गुन्हा करून पळणाऱ्या मुसलमान गुन्हेगारांचा आणि दहशतवाद्यांचा अड्डा झाला. परंतु राम मंदिर झाले आणि मग सीता मातेच्या या जन्मभूमीतील नागरिकांचा आत्मसन्मान जागा झाला. आपण नेमके कोण आहोत याचे आत्मभान आले आणि नेपाळने सर्वधर्मसमभाव नावाच्या विकृतीचा त्याग केला. सध्या नेपाळचे नागरिक रस्त्यावर आले आहेत , नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करा ही मागणी सुरु झाली असून मुसलमान हाकला नेपाळ वाचवा ही मागणी घेऊन नेपाळचे नागरिक रस्त्यावर आले आहेत. नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाहीच अवतरली पाहिजे ही सुद्धा आंदोलकांची मागणी आहे. एकंदर अयोध्येत राममंदिर झाले आणि सितामातेच्या भूमीतील नागरिकांनी सनातन धर्माच्या पुनरुत्थानाला आरंभ केला. भारतातील हिंदू असे रस्त्यावर कधी येणार ? भारताच्या संविधानातील सर्वधर्मसमभाव खोडला जाऊन हिंदू राष्ट्र कधी अवतरणार ?

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

स्वारगेट इथे एका तरुण मुलीला एका हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराने ताई , ताई म्हणून फसविले आणि तो तिला कोपऱ्यात पार्क केलेल्या एका बस मध्ये घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे बसस्थानकांची ढिसाळ सुरक्षा यंत्रणा , रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक हे जुगारी लोकांचे , गर्दुल्यांचे आणि छोट्या गुन्हेगारांचे अड्डे झाले असल्याचे परत एकदा उघड झाले आहे आणि या सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी सरकारने चोख सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे किती महत्वाचे आहे हे सुद्धा या निमित्ताने उघड झाले आहे. या शिवाय एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो, तो म्हणजे आपल्याकडे गेली हजारो वर्ष घरोघरी रामायण आणि महाभारत वाचले जात होते. रामायण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट शिकवते ती म्हणजे दशग्रंथी विद्वान रावण हा साधूचा वेश धारण करून तुम्हाला फसवू शकतो. महाभारत तुम्हाला एक महत्वाची गोष्ट शिकवते की तुमचे आपलेच नातेवाईक तुमचे वस्त्रहरण करण्याची इच्छा बाळगून असतात आणि स्त्रीने यासाठी सतत सावधान असणे आणि कुणावरही आंधळा विश्वास न ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. त्या तरुणीने ताई ताई म्हणणाऱ्या गुन्हेगारावर विश्वास ठेवला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पुरोगामी कितीही ओरडू द्या आपल्या मुलांना धर्मग्रंथ वाचायला द्या. ते केवळ नैतिकता शिकवत नसून समाजात कसे वावरावे याचे मानसशास्त्रीय शिक्षण सुद्धा कथारूपाने देण्याचे कार्य करतात.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पातळीवरील वोकीझम नावाच्या विकृतीला कायमचे हद्दपार करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यास आरंभ केला आहे आणि त्यासाठी आधुनिक मानवी समाज त्यांचा ऋणी राहील. यापूर्वी सर्वत्र स्त्री , पुरुष आणि तृतीयपंथी अशीच व्याख्या केली जात असे आणि क्रीडा क्षेत्रात स्त्री आणि पुरुष यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होत असत. वोकीझम च्या आहारी जाऊन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला महिलांच्या गटात टाकले गेले आणि बॉक्सिंग च्या लढतीत अल्जेरियाच्या इमान खेलीफ या बॉक्सर ने अन्जेला कॅरिनी या बॉक्सर महिलेला ठोसे मारून रक्तबंबाळ केले आणि पराभूत केले. या घटनेमुळे जागतिक पातळीवर संताप व्यक्त झाला होता परंतु अमेरिका आणि युरोपियन युनियन मधील राष्ट्रप्रमुख या वोकीझम संस्कृतीचे पुरस्कर्ते असल्याने विवेकाचा आवाज चिरडला गेला होता. पॅरिस ऑलिम्पिकचा उल्लेख पुरुषांनी महिलांवर हिंसात्मक अत्याचाराचे उदात्तीकरण करणारी स्पर्धा असे केले जाते आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा वेडाचार कायमचा संपवून टाकला आहे. त्यांनी सर्वत्र स्त्री आणि पुरुष अश्या दोनच लिंगांचा उल्लेख केला जाईल हे स्पष्ट केले असून तृतीयपंथी नागरिकांना पुरुषच समजले जाणार आहे असा आदेश काढला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

गेल्या काही दिवसात न्यायालयांची सक्रियता आणि त्यांनी संसदेवर किंवा लोकप्रतिनिधींवर कुरघोडी करण्याचा केलेला प्रयास अश्या पद्धतीच्या घटनांची संख्या वाढते आहे आणि त्यातून संसद विरुद्ध न्यायालय असा संघर्ष निर्माण झाला आहे. या घटनाक्रमाला सुरुवात झाली ती मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणूक प्रकरणापासून. आजवरच्या परंपरेनुसार विरोधी पक्षनेता , पंतप्रधान आणि राष्ट्रपती मिळून मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. यावेळी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सरन्यायाधीशांना सुद्धा या प्रक्रियेत सामील करावे अशी मागणी केली. सरकारने न्यायालयाने प्रशासनात लक्ष घालू नये असा संकेत असल्याचे सांगत ही मागणी फेटाळली आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत केली गेली. दोषी राजकीय नेत्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात एक शपथपत्र दाखल केले असून न्यायालयाने असा निर्णय देऊ नये अशी विनंती केली आहे कारण न्यायालयाचा असा निर्णय हा संसदेच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारा निर्णय असेल असे सरकारचे मत आहे. सरकार आणि न्यायालय या संघर्षात दोषी राजनेत्यांना संरक्षण मिळते आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page