🖋️ अभिजीत राणे लिहितात:
बातमी खरोखरच खळबळजनक आहे. जयदेव बाळासाहेब ठाकरे हे "मी जयदेव बाळासाहेब ठाकरे" या नावाच्या आत्मचरित्राची सध्या जुळवाजुळव करीत आहेत. गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते हे या आत्मचरित्राचे शब्दांकन करीत आहेत. ठाकरे कुटुंबातील सर्व व्यक्तींसंदर्भात जयदेव ठाकरे कुणाला काय वाटेल किंवा काय परिणाम होईल याचा विचार न करता बिनधास्त ह्या आत्मचरित्रात आठवणी देणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या निवडणुकीवर गंभीर परिणाम होईल याचा विचार करून जयदेव ठाकरे यांनी प्रकाशन निवडणूकी नंतर करायचा निर्णय घेतला आहे. आहे ना स्फोटक बातमी!
⬇️
🖋️ अभिजीत राणे लिहितात:
मा. शरद पवार देव ही संकल्पना मानत नाहीत. देव आणि दैव यावर त्यांचा बिलकुल विश्वास नाही. ह्याची जाहीर कबुली त्यांनी अनेकदा दिली आहे. असे असताना अलीकडे शरद पवार काही मंदिरात जाऊन देवदर्शन घेताना दिसले. यावर निर्माण वादावर उत्तर देताना ते म्हणाले की "मी स्वतःकरता जात नाही. पण माझ्या सहकाऱ्यांच्या भावनांचा अनादर होऊ नये म्हणून मी निर्विकार मनाने देवासमोर हात जोडून नमस्कार करतो. " हे खरे आहे पण मग ह्यात चलाखी, लबाडी, खोटारडेपणा आणि मुखवटा नाही का? ही फसवणूक कोणाची? देवाची की सहका-यांची ?
⬇️
🖋️ अभिजीत राणे लिहितात:
माहितगार अभ्यासू राजकीय विश्लेषकांशी मी नेहमी बोलत असतो. त्यांच्या एकूण निष्कर्षांचा सूर असा आहे की यावेळी पक्षांपेक्षा उमेदवारांबाबत मतदारांच्या मनात वैयक्तिक अँटी ॲक्युपन्सी रोष खूप जास्त आहे त्यामुळे निम्म्याहून पुन्हा उभे राहिलेले विविध पक्षांचे ५० टक्के विद्यमान आमदार पडतील. राजकारण्यांच्या पुढच्या पिढीला या वेळी मोठी संधी मिळेल आणि दीड एकशे नवे तरूण चेहरे २८८ च्या २०२४ च्या विधानसभेत दिसतील. शक्यता मलाही वाटते.
⬇️
🖋️ अभिजीत राणे लिहितात:
एखाद्या व्यक्तीला शासनाकडून पोलीस संरक्षण दिले जाते तेव्हा त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊनच समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. प्रश्न असा की आचार संहितेच्या काळात गुंड, समाजकंटक, धमक्या देणारेही आचार संहिता पाळतात की काय? जीवघेणे हल्ले आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून करीत नाहीत का? संबंधित व्यक्तीच्या जीवाला असलेला धोका कायम असताना आचार संहितेच्या आधारे संरक्षण काढून घेणे यामागे काही लॉजिक आहे की निर्बुद्ध शासकीय झापडबंद दृष्टीकोन? सरकारने पुनर्विचार करून सर्वांची आधी विचारपूर्वक दिलेली पोलीस संरक्षणे कायम ठेवावीत अशी माझी सूचना आहे.
⬇️
🖋️ अभिजीत राणे लिहितात:
"दहा वर्षापूर्वी मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी सरकारकडून प्रत्युत्तरादाखल काहीच कारवाई केली गेली नाही " असा दाहक आणि तत्कालीन सरकारची बेअब्रू करणारा गौप्यस्फोट केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. आज दहा वर्षांनी परिस्थिती बदलली आहे आणि आता जबरदस्त प्रतिकार आपण करू असेही एस जयशंकर म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अन्य मंत्री यांच्या राजीनाम्या पलीकडे या हलगर्जीपणा बद्दल त्यांना काही शिक्षा झाली नाही हे आणखी दुर्दैव!
⬇️🖋️ अभिजीत राणे लिहितात:
"उबाठा"च्या संभाव्य विजयात पडद्यावर खा. संजय राऊत आणि पडद्यामागे आ. मिलींद नार्वेकर हे दोन सूत्रधार असतील यात शंका नाही. आ. मिलींद नार्वेकर हे आता उद्धव ठाकरे यांचें केवळ सचिव नाहीत तर उबाठाच्या पक्षश्रेष्ठींपैकी एक झाले आहेत. तिकीट वाटपात उमेदवारांची माहिती, निवडून येण्याची क्षमता, स्थानिक जातीय - पक्षीय समिकरणे यांची अभ्यासपूर्ण माहिती मिळवून उद्धव ठाकरेंना देण्याचे अवघड आणि गुंतागुंतीचे काम आ.मिलींंद नार्वेकरांनी इतके परिपूर्ण केले की उमेदवारांची निवड उद्धव ठाकरें करता सोपी झाली, यशाची शक्यता वाढली. श्री तिरुपती बालाजी मंदिराची नवी मुंबईत उभी होत असलेली प्रतिकृती महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आता मंदिर उभारले जात आहे त्याचे श्रेय आणि पुण्य आ. मिलींद नार्वेकर यांना आहे. अशा या माझ्या ज्येष्ठ स्नेह्याला हार्दिक शुभेच्छा !
⬇️








Comments