मुंबई : मराठी साहित्य क्षेत्रातील एकमेव ओळख निर्माण करणारा साहित्यिक समूह म्हणजेच "शब्द शंकरपाळी साहित्य समूह, मुंबई." शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी गोरेगाव, मुंबई येथे या साहित्यिक समूहाचा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या दरम्यान भूषण सहदेव तांबे यांचे संपादकीय मनोगत झाल्यावर मुंबई मित्र या वर्तमानपत्राचे समूह संस्थापक तथा धडक कामगार युनियनचे संस्थापक/अध्यक्ष माननीय श्री. अभिजीत राणे साहेब यांच्या शुभहस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले.
यानंतर अभिजीत राणे साहेबांनी दिवाळीनिमित्त सर्वांना भेटवस्तू देऊन आणि मिठाई देऊन सर्व साहित्यिक मान्यवरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व साहित्यिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांचे साहित्यिक क्षेत्रातील योगदान व कार्य पाहून खूप सारे कौतुक केले. साहित्य क्षेत्रात जर कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास त्वरित आम्हास कळविणे त्यावर नक्कीच तोडगा काढला जाईल तसेच आमच्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आम्ही आश्वासन देतो. हे वचन देऊन त्यांनी साहित्यिकांना प्रेरणा मिळण्यासाठी जाहीर पाठिंबा दर्शवीला.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून साहित्यिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमात भूषण सहदेव तांबे, मृगनयना भजगवरे, संदेश जाधव, सारंग सबनीस, रंजना अय्यर, इत्यादी सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचा वैयक्तिक अभिप्राय कार्यक्रमात नोंदवून अभिजीत राणे साहेब यांचे आभार मानून त्यांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Comentarios