‘बॉलिवुड आयकॉनिक अचिव्हमेंट ॲवॉर्ड २०२४’ कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी अभिजीत राणे यांना ‘बॉलिवुड आयकॉनिक अचिव्हमेंट ॲवॉर्ड २०२४’ने प्रसिध्द बॉलिवुड सिने अभिनेता सोनु सुद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सिने अभिनेत्री पुजा तिवारी व राजकरन तिवारी यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल जे डब्लयु मेरेयेट, जुहु येथे हा सोहळा पार पडला.











コメント