[ पंचनामा ]
==================
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले अधिक बळ
● अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक बळ दिले आहे. राज्यात दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला आता अधिक मनुष्यबळ मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने ३६४ नव्या पदांना आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मंजुरी दिली आहे. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी स्थापन झालेल्या या टास्क फोर्ससाठी आवश्यक असलेल्या ३४६ नियमित आणि ३६ बाह्य पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली. नियमित पदांमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार, शिपाई, चालक आणि लिपिकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. बाह्य यंत्रणेद्वारे वैज्ञानिक सहाय्यक, विधी अधिकारी, कार्यालयीन शिपाई आणि सफाई कर्मचारी यांची भरती केली जाणार आहे. या उपक्रमासाठी वार्षिक १९ कोटी २४ लाख रुपये आणि वाहन खरेदीसाठी ३ कोटी १२ लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comentários