top of page

अंतर्गत वादाच्या चर्चांना अमित साटम यांनी दिला पूर्णविराम

  • dhadakkamgarunion0
  • Jan 20
  • 1 min read

🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]

▪️==================▪️

अंतर्गत वादाच्या चर्चांना अमित साटम यांनी दिला पूर्णविराम

● भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महायुतीमध्ये महापौरपदावरून कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा रस्सीखेच नसल्याचे म्हटले आहे. मुंबईकरांनी विकासाच्या बाजूने कौल दिला असून, महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर असलेल्या एकाधिकारशाहीला या निवडणुकीत चाप बसला आहे. अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मुंबईत आक्रमक प्रचार केला होता. साटम म्हणाले की, महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकजुटीने काम करत आहेत. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे संख्याबळ पुरेसे असून महापौर निवडीची प्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने पार पडेल. महायुतीमध्ये कोणाचा महापौर होणार यावरून वाद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, अमित साटम यांनी या चर्चा केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. ‘आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. वरिष्ठ नेते एकत्रित बसून योग्य वेळी योग्य निर्णय घेतील,’ असे त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे सरकार जसे राज्यात काम करत आहे, तसेच मुंबई महापालिकेतही काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

©️ -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Recent Posts

See All
निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब ● ‘राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी हे स्पष्ट केले

 
 
 
राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर ●सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page